आता 'एक करोड संजय राऊत समर्थकांचा ग्रुप'; सोशल मीडियावर 'संजय राऊत' यांचीच चर्चा


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकांच्या निकालाला अकरा दिवस उलटून गेले तरी सत्तास्थापनेची कोंडी कायम आहे.

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत.

निकालानंतर संजय राऊतांनी सुरु केलेली बॅटिंग अजूनही जोमात आहे.

सामनातल्या अग्रलेखासोबतच संजय राऊत ट्विटरद्वारेही भाजपला चिमटे घेत आहेत.

निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी व्यंगचित्र पोस्ट करत सूचक संदेश दिला होता. आता शायरीद्वारे ते शरसंधान साधत आहेत.

सोशल मिडीयावर राऊत सर्वात जास्त चर्चेत आहेत. त्यांच्यावरच्या मिम्स, व्हिडीओ आणि पोस्टचा सोशल मिडीयावर पाऊस पडत आहे.

फेसबुकवर तर ‘एक करोड संजय राऊत समर्थकांचा ग्रुप’ या नावाने समूहही तयार झाला आहे. यावर संजय राऊत यांच्याविषयीच्या पोस्ट धुमाकूळ घालत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post