लेखी प्रस्ताव दिला तरच भाजपशी चर्चा : संजय राऊत


वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेच्या प्रस्तावासाठी दारे खुली आहेत असे वक्तव्य केले होते.

त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित जे ठरलं होतं, त्याचा लेखी प्रस्ताव आम्हाला द्या, मग चर्चा करु’ असा पवित्रा घेतला आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करू हे भाजपाचं फार समंजस निवेदन आहे. मात्र त्यांनी ते फार उशीरा केलं. हीच भूमिका आधी घेतली असती तर सत्ता स्थापनेचा निर्णय लांबला नसता.

शिवसेना आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. लोकसभेच्यावेळी अमित शहा यांच्या उपस्थित जे ठरलं होतं तोच प्रस्ताव आहे. नवा प्रस्ताव पाठवण्याची गरजच काय.

त्यावेळी ठरल्याप्रमाणेच होईल आणि ठरल्याप्रमाणेच करा, एक काडीही जास्त नको. शिवसेना पक्षप्रमुखांनी आधीपासूनच ही भूमिका घेतली आहे. त्यात तडजोड करणार नाही.

चर्चा आमच्यामुळे थांबलेली नाही. ठरलेली गोष्ट नाकारणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. आम्ही कधीही शब्द बदलले नाही.

मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करणार हे भाजपने लिहून पाठवावं. मग आम्ही चर्चा करू, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post