शबरीमला मंदिरासाठी वेगळा कायदा आणावा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश


वेब टीम : दिल्ली
शबरीमला अयप्पा मंदिर प्रकरणी 4 आठवड्यात कायदा बनवून प्रशासन आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये केरळ सरकारला शबरीमला मंदिराप्रकरणी नवा कायदा आणण्यास सांगण्यात आले होते.

पण राज्य सरकारने त्रावनकोरकोचीन रिलीजियस इंस्टिट्यूशन एक्टचा ड्राफ्ट सादर केला.

सरकारतर्फे शबरीमला आणि बाकी मंदिरांसाठी संयुक्त कायदा आणू इच्छित होते. पण सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली.

शबरीमला मंदिरासाठी वेगळा कायदा हवा. न्यायालयाने सरकारला कायदा आणण्यासाठी जानेवारी 2020 पर्यंत वेळ दिला आहे.

आमच्या आदेशाचे पालन व्हावे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post