त्यांना काहीही करू द्यात, शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेणार : खा. संजय राऊत


वेब टीम : मुंबई
भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि वानखेडे मैदान बुक केल्याची चर्चा आहे सर्वत्र सुरु आहे. याची कागदपत्रेही आमच्याकडे आहेत.

परंतु, शिवसेनेचा मुख्यमंत्री हा शिवतीर्थावरच शपथ घेईल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी शिवसेना काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे  देखील सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक पर्याय खुले होते, त्यांनी नुकतीच एका पर्यायावरची चर्चा संपवली आहे.

त्यांचा निर्णयही जवळपास अंतिम झाला आहे. शिवसेनेकडे सध्याच्या घडीला 170 पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे, असा दावा या वेळी राऊत यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post