... तरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार : नवाब मलिक


वेब टीम : मुंबई
भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर आता राज्यात कोणतं समीकरण उदयास येणार याची चर्चा आहे. राष्ट्रवादी सेनेला पाठिंबा देणार का याबाबत राष्ट्रवादीने सबुरीची भूमिका घेतली आहे.

‘शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायची का नाही याबाबत राष्ट्रवादीने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडावं. त्यानंतर आम्हाला प्रस्ताव द्यावा, मग निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आम्ही सध्या राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. ते काय निर्णय घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. शिवसेनेने आधी भाजपसोबतचं नातं तोडत केंद्र सरकार आणि एनडीएमधूनही बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं पाहिजे.

नाहीतर केंद्रात सत्तेत आणि राज्यात वेगळ्या आघाडीत असं चित्र निर्माण होईल. त्यामुळे शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडत सत्ता स्थापनेबाबतचा रितसर प्रस्ताव द्यावा.

त्यांच्या अटी आणि शर्तीही सांगाव्यात. त्यानंतर आम्हाला काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेता येईल. रितसर प्रस्ताव आल्यावरच चर्चा पुढे जाईल.

राज्यात कोणतेही दोन पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरच राज्यात सत्ता स्थापन होऊ शकते.

अन्यथा वेळकाढूपणा होईल. त्यामुळे आघाडी सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही. आमच्याकडे बहुमतही नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post