सिद्धूची हौस भागेना; पाकिस्तानात जाण्याची मागितली परवानगी


वेब टीम : दिल्ली
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे.

त्यासाठी सिद्धू यांनी एस.जयशंकर यांना पत्र लिहिले.पाकिस्तानात नऊ नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. पाकिस्तानने या कार्यक्रमाचे नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण आहे.

कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनच्या ऐतिहासिक प्रसंगी आमचे महान गुरु बाबा नानक यांच्या पूजनाची संधी मिळणे हा मोठा सन्मान आहे असे सिद्धूने परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले.

कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे गुरुद्वारा दरबार साहिबला जाणाऱ्या भारताच्या अधिकृत शिष्टमंडळाचा जे भाग नाहीत त्यांना सामान्य प्रक्रियेनुसार राजकीय परवानगी घ्यावी लागेल असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारीच स्पष्ट केले होते.

ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती.भारतातून कोण यात्रेकरु जाणार आहेत त्याची यादी पाकिस्तानला दिली आहे. राजकीय क्षेत्रातून विविध व्यक्ती कर्तारपूरला जाणार आहेत.

पाकिस्तानला ज्या लोकांना निमंत्रित करायचे आहे किंवा ज्यांना भविष्यात जायचे आहे अशा सर्वांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी प्रक्रियेनुसार राजकीय मंजुरी घ्यावी लागेल असे परराष्ट्र मंत्रालयाकडून समजते.

कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब येथे दर्शनासाठी जाणाऱ्या ५७५ यात्रेकरुंमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा समावेश असल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post