...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल : मुनगंटीवार


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे.

खातेवाटप आणि मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच अजूनही सुरु आहे.

‘राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल,’ अशी शक्यता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.


‘भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना समसमान खातेवाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे.

शिवसेनेची हीच मुख्यमंत्रिपदाची मागणी या झालेल्या तिढ्यामागचं मुख्य कारण आहे.

आपल्या राज्याला आपण पुरोगामी संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वी कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही.

राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post