अपघात झाला अन् मालट्रकने घेतला पेट


वेब टीम : अहमदनगर
पुणे मार्गावर कामरगाव शिवारात मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात मालट्रकने अचानक पेट घेतला. 

आगीत मालट्रक व मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी (दि. 29) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत प्रत्यक्षदर्शनी सांगितले की, वेगात जाणार्‍या मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकलस्वाराने जळगावकडून पुण्याकडे पेपर घेऊन जाणार्‍या मालट्रकला धडक दिली. 

या धडकेत मोटारसायकल मालट्रकच्या दोन्ही चाकाच्यामध्ये अडकल्याने वेगात असलेल्या मालट्रकला खालील मोटारसायकलला फरफटत नेले. यावेळी मोटारसायकलस्वार ट्रकखालून बाजूला फेकला गेल्याने बचावला. 

ट्रकखालून घसरत जाणार्‍या मोटारसायलने पेट घेतल्याने मालट्रकने पण पेट घेतला. मालट्रक पेटल्याचे निदर्शनास येताच ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून केबीनच्या बाहेर उडी घेतली. त्यात तो किरकोळ जखमी झाला.

नागरीकांनी जखमी ट्रकचालक व मोटारासायकलस्वार यांना औषधोपचारकरीता रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडताच घटनास्थळावर नागरीक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी नगर तालुका पोलिस ठाणे व अग्निशामक दलास घटनेची माहिती दिली. 

माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी पोहचली.

अग्निशामक पथकातील कर्मचारी शिवा कदम, संतोष कोतकर, श्री. काळे यांनी पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post