उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; जोरदार शक्तिप्रदर्शन


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर झालेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई-वडिलांचं स्मरण करून आणि संविधानाला स्मरुन उद्धव यांनी शपथ घेतली आणि शिवतीर्थावर जल्लोष करण्यात आला.

एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंना वंदन करुन शपथ घेतली. तर जयंत पाटील यांनी शपथ घेताना आपल्या वडिलांसोबतच आईचेही नाव घेतले.

पूर्वाश्रमीचे शिवसेना आमदार छगन भुजबळ यांनी महात्मा फुले, बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांना वंदन केलं. नितीन राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत मंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी इतर मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post