गांधी कुटुंबाला आता सुरक्षेचे नवे कवच


वेब टीम : दिल्ली
गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच काढून झेड प्लस सुरक्षा करणार आहे. एसपीजी म्हणजे ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’. या सुरक्षा बदला संदर्भातील निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला.

या संदर्भातील वृत्त एका खासगी वृत्त वाहिनीने दिले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुले राहुल, प्रियंका गांधी वढेरा यांना आता झेड प्लस श्रेणीची सुरक्षा असेल.

गांधी कुटुंबाला याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

हा निर्णय सुरक्षे संदर्भातील आढावा घेतल्यानंतर घेतला. एसपीजी ही पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा संभाळणारी पहिली एलिट फोर्स आहे.

यामध्ये ३००० अधिकारी आहेत. एसपीजीकडे आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.

झेड प्लसमध्ये गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) असेल.

गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच काढण्याच्या निर्णयावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post