Cow - dung Cakes : अमेरिकेच्या दुकानांमध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या विक्रीला


वेब टीम : न्यूयॉर्क
अमेरिकेच्या अनेक दुकानांमध्ये ‘मेड इन इंडिया’ गाईच्या शेणाच्या गोवऱ्या विकल्या जात आहेत.

अर्थात, भारतीय वंशाचे नागरिक ज्या भागात राहतात तिथे .

समर नावाच्या व्यक्तीच्या चुलत भावाला अमेरिकेत न्यू जर्सीत एका किराणा दुकानात गौरीचे हे पाकीट दिसले.

त्याने समरला छायाचित्रासह ही माहिती कळवली. समर यांनी ही माहिती ट्विटरवर टाकली.

१० गोवऱ्यांचे आकर्षक पाकीट २. ९९ डॉलर (सुमारे २०० रुपया)ला मिळते. पाकिटावर ठळकपणे Cow – Dung Cakes. product of India असे लिहिलेले आहे.

या गोवऱ्या फक्त धार्मिक कामासाठी आहेत. खाण्यासाठी नाही, अशी सूचनाही छापली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post