सनी लिओनीचा 'हॉट' अंदाज; 'हॅलो जी'मध्ये 'सेक्सी थ्रिलर्स'


वेब टीम : मुंबई
'रागिनी एमएमएस रिटर्न्स' मध्ये सनी लिओनी एका खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सनी लिओनी स्पेशल डान्स नंबर 'हॅलो जी' मध्ये दिसणार आहे. हे गाणं मीत ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केले आहे.

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत सनीशिवाय रागिनी एमएमएस रिटर्न्स? होऊ शकत नाही !!! असे लिहिले आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स चित्रपटामध्ये सनीसोबत वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चित्रपटामध्ये काम करणार आहे. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'रागिनी एमएमएस २' चित्रपटात सनी लिओनीने काम केले होते.

या चित्रपटात सनीवर चित्रित झालेले 'बेबी डॉल' हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते. सनी लिओनी पुन्हा एकदा 'रागिनी एमएमएस' सीरीजमध्ये दिसणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post