अजित पवार गेले बाजूला; सुप्रियाताईंचे रोहित- आदित्यसोबत फोटोशूट


वेब टीम : मुंबई
भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. त्यामुळे भाऊ-बहीण असलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नात्यात वितुष्ट आल्याचे दिसते. सध्या सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन शेअर केलेल्या फोटोसंदर्भात चांगलीच चर्चा सुरु आहे.

त्यांनी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत देखील दिसत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटूंब यांच्यात फूट पडली असल्याचे पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये त्यांनी हे वाक्य लिहिले होते.

वाय बी सेंटरबाहेर काही पत्रकारांशी बोलताना त्या भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले होते. दुसऱ्या एका स्टेटसमध्ये त्यांनी आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचा, ज्याच्यावर मनापासून प्रेम केले त्याच्याकडूनच फसवणूक झाली, असेही म्हटले होते.

राज्यातील संत्तासंघर्षाच्या गुंतागुतीच्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सूचक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी घरात फूट पडल्याची नाराजी व्यक्त केली होती.

याशिवाय त्यांनी साताऱ्यातील शरद पवार यांच्या भरपावसातील सभेतील क्षणाची आठवण करुन देत साहेबांच्या प्रेरणेने पुन्हा नव्या उमेदीने उभे राहू, अशी भावनाही व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post