थलाइवी : कंगना आता जयललितांच्या भूमिकेत; पहा फर्स्ट लुक


वेब टीम : मुंबई
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘थलाइवी’ असं या बायोपिकचं नाव असून अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारत आहे. जयललिता यांच्या या बायोपिकमध्ये कंगना खूपच वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.

‘थलायवी’च्या पहिल्या पोस्टरवर कंगना रणौत जयललितांसारख्याच ग्रीन केपमध्ये दिसत आहेत. तसेच या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये कंगना विक्ट्री साइन देताना दिसत आहे.

जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा 26 जून 2020 ला रिलीज होणार आहे. जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post