आदर्श सोसायटी बाबत कोणतीही चौकशी सुरू नाही: ईडीचा लेखी खुलासा


वेब टीम : मुंबई
काही प्रसारमाध्यमांमध्ये  ईडीने आदर्श सोसायटी बाबत नव्याने चौकशी सुरू केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

सदर वृत्त काल्पनिक व तथ्यहीन असुन अशा प्रकारची कोणतीही नवीन  चौकशी सुरू झालेली नाही, असा स्पष्ट व लेखी खुलासा ईडीने एका पत्रकाद्वारे केला आहे.

असे तथ्यहीन व दिशाभूल करणारे वृत्त पसरविणारया प्रवृत्तींचा महाराष्ट्र प्रदेश काॅन्ग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री विनायकराव देशमुख यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

याबाबत श्री. देशमुख यांनी म्हटले आहे की, आ.अशोकराव चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असुन काॅन्ग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व महत्वाचे नेते आहेत.

काल नवीन मंत्रीमंडळाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर काही हितशत्रुंनी आ.अशोकराव चव्हाण यांना अपशकुन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

अशा प्रवृत्तींचा राज्यातील काॅन्ग्रेस कार्यकर्ते तीव्र शब्दात निषेध करत आहेत, असे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post