नागरिकत्व सुधारणा कायदा : देशभरात हिंसक निदर्शने, अनेक ठिकाणी गोळीबार

फाइल फोटो

वेब टीम : दिल्ली 
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून उत्तर प्रदेशात सलग दुसर्‍या दिवशी शुक्रवारी जोरदार हिंसक निदर्शने झाली. अनेक ठिकाणी नमाज पठणानंतर आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले.

बिजनौरमध्ये गोळी लागून दोन युवकांचा मृत्यू झाला. तर मेरठ, संभळ आणि फिरोजाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. मेरठमध्ये पोलीस चौकी पेटवून देण्यात आली. आतापर्यंत आंदोलनादरम्यान ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच कानपूरमध्येही एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीत जामा मशिदीबाहेर हजारोच्या संख्येने नागरिक जमले होते. ते जंतर-मंतरपर्यंत मोर्चा काढणार होते. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली.

सुरक्षेखातर दिल्लीतील १३ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले. दरम्यान, गुजरातमध्ये गुरूवारी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 5 हजारहून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले.

उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि संभलमधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी सात खटले दाखल केले असून २०० हून अधिक जणांना अटक केली आहे. कर्नाटकात मंगळुरू आाणि कन्नड जिल्ह्यात आज (शनिवार) रात्री १० पर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे. मंगळुरूमध्ये बस सेवा, तर बंगळुरूमध्ये शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

आसाममध्ये ११ डिसेंबरपासून बंद असलेली इंटरनेट सेवा काल सुरू झाली. बिहारमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. तामिळनाडूत ६०० आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ आणि संगीतकार टीएम कृष्णा यांचादेखील समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post