आशियाई विकास बँकेनेही भारताचा विकासदर घटवला; असा होणार परिणाम


वेब टीम : मनीला
रिझर्व्ह बँक, मुडीज, ’आयएमएफ’ पाठोपाठ आता आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताचा चालू वर्षाचा विकासदराचा (जीडीपी) अंदाज 5.1 टक्क्यापर्यंत घटवला आहे.

मंदी आणि बेरोजगारीमुळे अर्थव्यवस्थेची वाढ मंदावेल, असे भाकीत करत एडीबी ने चालू वर्षाचा आणि पुढील आर्थिक वर्षाचा विकासदराचा अंदाज कमी केला.

गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने यंदा विकासदर 5 टक्के राहील, असा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी आरबीआयने 6.1 टक्के जीडीपीचा अंदाज व्यक्त केला होता.

मात्र औद्योगिक क्षेत्रातील मंदीने विकासाला ब्रेक लागला आहे. एडीबीच्या मते आशियातील मंदीने भारत आणि चीन या देशांचा वृद्धिदर कमी होईल. भारतीय अर्थव्यवस्था चालू वर्षात 5.1 टक्क्यांनी वाढेल. पुढील वर्षी जीडीपी दर 6.5 टक्क्यांपर्यंत जाईल.

वित्तीय सेवा क्षेत्रातील रोकड संकट आणि रोजगार निर्मितीतील संथ वृद्धीमुळे विकासदर वाढण्यात अडथळा निर्माण झाला आहे. सप्टेंबरपासून तो 6.5 टक्के आणि 7.2 टक्के राहील, असे एडीबी ने म्हटले आहे.

बँकेने आशियाचा विकासदर 5.2 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी ऊइने आशियाचा विकासदर 5.4 टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता.

आशियातील खंडातील मंदीचा प्रभाव पाहता चीनला सुद्धा झळ बसणार आहे. बँकेने चीनचा विकासदर चालू वर्षासाठी 6.1 टक्के आणि पुढील वर्षासाठी 5.8 टक्के केला आहे.

अमेरिका आणि चीनमधील दीर्घकाळ सुरु असलेल्या व्यापारी युद्धाने चिनी उद्योगांवर प्रचंड परिणाम झाला आहे. पुढील वर्षात चीनची वृद्धी कमी होईल, असे एडीबी ने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post