जीडीपी म्हणजे धर्मग्रंथ नाही, गांभीर्याने घेऊ नका : भाजप खासदार


वेब टीम : दिल्ली
देशाचा विकास दर घसरल्याचे वृत्त ताजे असतानाच भाजप खासदाराने मात्र भविष्यात जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही, जीडीपी म्हणजे धर्मग्रंथ नसल्याने तेच सत्य आहे असं मानण्याची गरज नाही, असं धक्कादायक विधान लोकसभेत केलं आहे.

लोकसभेत कार्पोरेट टॅक्सवर चर्चा सुरू असताना भाजपचे झारखंडमधले खासदार निशिकांत दुबे यांनी हे अजब वक्तव्य केले.

 दुबे म्हणाले, ‘जीडीपी १९३४मध्ये आला. त्यापूर्वी जीडीपी हा प्रकार नव्हता. जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही.

त्यामुळे जीडीपीला सत्य मानून चालणार नाही आणि भविष्यात जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही.

सर्वसामान्य लोकांचा आर्थिक विकास होत आहे की नाही हाच आजचा नवा सिद्धांत आहे. त्यामुळे जीडीपीपेक्षा निरंतर विकास होत आहे की नाही, हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post