आयपीएल २०२० : दहावी पास गोलंदाजावर लागली 'इतक्या' रकमेची बोली


वेब टीम : कोलकाता
आयपीएल २०२०च्या लिलावात भारताच्या १९ वर्षाखालील संघातील वेगवान गोलंदाज आकाश सिंह याला राजस्तान रॉयल्स संघाने २० लाख रुपयांना खरेदी केले.

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या १९ वर्षाखालील विश्व करंडक संघात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

आकाश मूळचा राजस्तानचा असून २०१७मध्ये एका स्पर्धेत १० गाडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे आकाशने १० बाद करताना एकही धाव दिलेली नव्हती. या कामगिरीनंतर १६ वर्षाखालील संघात त्याची निवड झाली होती.

आकाशचे गाव भरतपूर असून तो क्रिकेटसाठी जयपूर आला. १७ वर्षीय आकाशला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्यामुळेच त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. याचा परिणाम असा झाली की १० वीच्या परीक्षेत तो एक दोन वेळा नव्हे तर चार वेळा नापास झाला.

राजस्तानकडून १६ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील संघात त्याने शानदार कामगिरी केली आहे. गेल्या दीड वर्षात २९ सामन्यात त्याने ११८ विकेट घेतल्या आहेत.

आकाश अतिशय सामान्य घरातील असून त्याचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे.आकाशचे क्रिकेट प्रेम पाहूनच कुटुंबाने त्याला संपूर्ण पाठिंबा दिला. आकाशला भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने मार्गदर्शन केले.

झहीर खान आणि आशिष नेहरा हे आकाशचे आवडते गोलंदाज आहे. क्रिकेटमधील कामगिरी चांगली राहण्यासाठी तो फास्ट फूडपासून दूर राहतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post