देशात १०० कोटी हिंदू, त्यामुळे भारत हिंदुराष्ट्रच : रवी किशन


वेब टीम : दिल्ली
भाजपचे खासदार, अभिनेते रवी किशन यांनी, ‘भारतात हिंदूंची लोकसंख्या १०० कोटी आहे. त्यामुळे साहजिकच भारत हे हिंदूराष्ट्रच आहे,’ असे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच नागरिकता सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. लवकरच हे विधेयक संसदेत मांडले जाणार असून विरोधी पक्षांनी मात्र याला कडाडून विरोध केला आहे.

संसद भवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना रवी किशन यांनी नानागरिकता सुधारणा विधेयकाचं समर्थन केलं. ते म्हणाले, ‘हे विधेयक संसदेत येणं हा प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाचा क्षण आहे.

भारतात मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. मात्र, असे असतानाही हिंदूंचं स्वतंत्र अस्तित्व, ओळख आणि संस्कृती जिवंत आहे, हा एक चमत्कारच आहे.

भारत नावाच्या मातृभूमीमुळेच हे शक्य झाले आहे. भारतात १०० कोटी लोक एकाच ठिकाणी राहतात ही अभिमानाची गोष्ट आहे.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates