अहमदनगर : पाच सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केले स्थानबद्ध


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाळू तस्कर, अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांनी मिळालेल्या आदेशान्वये पाठवलेल्या एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी अंतीम निर्णय देवून पाच सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

या कारवाईत प्रशांत उर्फ पांड्या साईनाथ लेकुरवाळे (वय 23, रा.निमगाव खैरी, ता.श्रीरामपूर), गणेश उर्फ सोमनाथ बापूसाहेब हळनोर (वय 25, रा.फात्याबाद, ता.श्रीरामपूर), कमलेश दिलीप देडे (वय 23, रा.डेरेवाडी, धांदरफळ, ता.संगमनेर), संतोष राघू शिंदे (वय 40, राजापूर, ता.श्रीगोंदा), राजू उर्फ राजेंद्र भाऊ गागरे (वय 40, रा.मांडवे खुर्द, ता.पारनेर) यांचा समावेश असून त्यांना मंगळवारी (दि.24) ताब्यात घेऊन 1 वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधिक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनेखाली अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस उपअधीक्षक राहूल मदने, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित तसेच पारनेर, बेलवंडी, संगमनेर तालुका, श्रीरामपूर तालुका, लोणी या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जमादार मधुकर शिंदे, जमादार सोन्याबापू नाणेकर, रविंद्र कर्डिले, पो.कॉ. किरण जाधव, पो.कॉ. सुरेश वाबळे, विजय वेठेकर, मनोज गोसावी, बबन मखरे, दत्ता गव्हाणे, विशाल गवळी, सचिन अडबल, अण्णा पवार, राहूल सोळुंके, भागीरथ पंचमुख, विजय ठोंबरे, प्रकाश वाघ, जालिंदर माने, योगेश सातपुते, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, चालक संभाजी कोतकर, सचिन कोळेकर यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post