आता वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे मोजावे लागणार


वेब टीम : दिल्ली
वोडाफोन-आयडियाने आपल्या नवीन प्रीपेड प्लानचे दर वाढवले आहे. या नव्या प्लान अंतर्गत व्हाईस कॉल आणि डेटाचे दर येत्या ३ डिसेंबरपासून ग्राहकांना नवीन दरानुसार महागणार आहेत.

वोडाफोन-आयडियाने आतापर्यंत सर्वात स्वस्त १९ रुपयांचा प्रीपेड प्लान आणला आहे. यात युजर्सना अनलिमिटेड कॉल, डेटा आणि दोन दिवसांची वैधता आहे.

या प्रीपेड प्लानमध्ये हायस्पीड डेटा आणि कॉलिंग सुविधा मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. वोडा-आयडियाचा कॉम्बो प्लान असून ग्राहकांसाठी ४९ आणि ७९ रुपयांचा प्लान आणला आहे.

ग्राहकांसाठी ४८ रुपयाच्या पॅकमध्ये ३८ रुपयांचा टॉकटॉइम, १०० एमबी डेटा, आणि २८ दिवसांची वैधता आहे. तर दुसरीकडे ७९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ६४ रुपयांचा टॉकटाइम, २०० एमबी डेटा आणि २८ दिवसांची वैधता आहे.

वोडा-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी १४९ रुपये आणि २४९ रुपयांचा प्लान लाँच केले आहेत. ग्राहकांना १४९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे.

२४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा प्रतिदिन, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे.

२९९ आणि ३९९ रुपयांचे पॅक ३ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. २९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे.

तर ३९९ रुपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. ३७९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, ६ जीबी डेटा आणि १०० एसएमएस सुविधा मिळणार आहे.

५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा दररोजसह १०० एसएमएस मिळणार आहे.

तर ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज आमि १०० एसएमएस मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post