बीड : भीषण अपघातात तिघे ठार


वेब टीम : बीड
औरंगाबादकडून मुखेडकडे निघालेल्या एसटी बसची बोलेरो पिकअपला समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत.

या अपघातात १५ पेक्षा जास्तजण जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

हा अपघात आज दुपारी दोनच्या सुमारास केज अंबाजोगाई जवळील चंदनसावरगाव रस्त्यावर झाला.

अपघातीतल जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे सातत्याने अपघात होत असल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post