सत्तेच्या हावेपायी मित्रांना कसं डावललं जात हे आम्ही पाहिलंय : आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल


वेब टीम : नागपूर
“सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे एवढं नक्की.

यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा असले प्रकार होऊ देणार नाही” अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल चढविला.

कुठेही चिखल करा आणि कमळ फुलवा असं होऊ देणार नाही अशी टीका करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर तिखट शब्दांमध्ये टीका केली.
“नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे अनेक उद्योग बुडाले.

मात्र आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. केजी टू पीजी शिक्षण बदलण्याची गरज आहे. त्यात नोकरीचीही हमी हवी, डिजिटल एज्युकेशन हे गाव पातळीवर न्यावं लागेल” असंही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post