वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन मुलींची सुटका


वेब टीम : अहमदनगर
बेकायदेशीररित्या मुलींकडुन अनैतिक देहव्यापार चालविणार्‍या हॉटेल सन राईज लॉजिंगवर पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत दोन मुलींची सुटका करून दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.18) सायंकाळी केली.

याबाबतची माहिती अशी की, सोलापुर रोड वरील वाकोडी फाटा येथील सन राईज लॉजिंगवर मोठ्या प्रमाणात अनैतिक देह व्यापार चालत असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांना मिळाली.

यावरून अप्पर पोलिस अधिक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके, पो.नि. विकास वाघ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, हे.कॉ. निमसे, पो.ना. काळे, तागड, फसले, पो.कॉ. गाडगे, जाधव, महिला पोलिस वसुधा भगत, गायकवाड या टीमने सन राईज लॉजिंग येथे छापा टाकला.

या कारवाईत प्रकाश धनाजी सपकाळ (वय 27, रा. सारसनगर, अ.नगर), रामेश्‍वर आप्पा पाटील (वय 27, रा. गंगापुर, औरंगाबाद) यांना अटक केली. अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन मुलींची सुटका केली.

याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post