औरंगाबाद : कार- रिक्षाच्या भीषण अपघातात चौघे ठार


वेब टीम : औरंगाबाद
औरंगाबाद-जालना मार्गावर भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.हा अपघात भरधाव मोटारीने एका रिक्षाला धडक दिल्याने झाला.

चारही मृत रिक्षा प्रवासी होते. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

हा अपघात आज (बुधवार) सकाळी पावणे दहाच्या दरम्यान झाला. आज सकाळी पावणे जालना येथून निघालेली रिक्षा औरंगाबाद दिशेकडे शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंप समोरून जात होता.

त्याच वेळी औरंगाबाद दिशेने भरधाव वेगाने येणारी मोटार दुभाजकावरून विरुद्ध दिशेला येऊन रिक्षावर वेगाने धडकली.

या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशी चिरडले. यात चार जागीच ठार झाले तर यात एक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post