भयंकर : पंतप्रधानांची प्रचार सभा सुरु असतांनाच झाला रॉकेट हल्ला


वेब टीम : यरुशमल
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आपली सभा अर्धवट सोडून सभेच्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना घडली. सभा सुरू असताना पंतप्रधान नेतन्याहू यांना रॉकेटचा आवाज आल्याने ते तेथून निघून सुरक्षित स्थळी गेल्याचे समजते.

इस्रायलच्या हल्ल्यात इस्लामिक जिहाद कमांडर मारला गेल्यानंतर या देशात वरचेवर मिसाइल हल्ले होतात. या घटनेवरून केवळ इस्रायलच्या जनतेत भीतीचे वातावरण नसून पंतप्रधान नेतन्याहू यांनीही भितीपोटी पळ काढल्याचे म्हटले जाते. नेतन्याहू सभेच्या दुसऱ्याच दिवशी पक्षाच्या प्रायमरीसाठी प्रचार करत होते.

इस्रायलमध्ये एखाद्याने रॉकेटचा आवाज ऐकून मध्येच कार्यक्रम सोडून जाण्याची ही काही महिन्यांमधील ही दुसरी घटना आहे. क्षेपणास्त्रे डागल्यानंतर पॅलेस्टाईन एन्क्लेव्हजवळ आणि दक्षिणेतील शहर अश्केलॉनमध्ये सायरन वाजू लागले.

त्यावेळी नेतन्याहू अश्केलॉमध्ये सभेतच होते, असे लष्कराने म्हटले. इस्रायलचा शासकीय प्रसारणकर्ता केएएन-११ ने काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. यात सुरक्षा रक्षक पंतप्रधानन नेतन्याहू यांना ‘रेड ऍलर्ट’ संदर्भात माहिती देताना दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post