छगन भुजबळ यांनी केली घोषणा; 'या' दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

file photo

वेब टीम : नाशिक
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी ३० तारखेला होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीतील कोणतेही मतभेद नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदा बाबतच्या ज्या चर्चा आहेत या केवळ वृत्तपत्रांमधून आहेत. त्यात तथ्य नाही, असा दावा भुजबळांनी केला. मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला झाल्यानंतर खातेवाटपही त्याच दिवशी होईल,असे भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचे प्रकरण न्यायालयात आहे. यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही, असे सांगत त्यांनी सिंचन गैरव्यवहाराबाबत भाष्य करणे टाळले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. पण काँग्रेसची यादी होत नाही,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अलिकडेच म्हणाले होते.

मंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. गृहमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याची चर्चा आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post