चीनचे जहाज आले भारतीय हद्दीत; नौदलाने लावले पिटाळून


वेब टीम : चेन्नई
पोर्ट ब्लेअरजवळील भारताच्या सागरी हद्दीत विना परवानगी शिरलेल्या एका चिनी जहाजाला भारतीय नौदलाने पिटाळून लावले.

अंदमान-निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअरजवळ शी यान १ या चिनी जहाजाचे संशोधन कार्य सुरु होते. भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानांनी हे चिनी जहाज शोधल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली.

भारतीच नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा चीनकडून या जहाजाचा वापर होऊ शकतो इशारा दिला होता.

भारताच्या आर्थिक क्षेत्रात या जहाजाचे संशोधन कार्य सुरु असल्याचे समजल्यानंतर भारतीय नौदलाकडून या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवली.

कायद्यानुसार कुठल्याही दुसऱ्या देशाला भारताच्या सागरी आर्थिक क्षेत्रामध्ये शोधकार्य करण्याची परवानगी नाही.

नौदलाच्या युद्धनौकेने या जहाजाला भारतीय सागरी हद्दीबाहेर जाण्यास सांगितले. नौदलाच्या इशाऱ्यानंतर शी यान १ भारतीय सागरी हद्दीतून बाहेर पडले.

पुन्हा हे जहाज चीनच्या दिशेने गेले असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे. हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post