आम्ही ताकदवान होतो हे पंकजांनी मान्य केले : धनंजय मुंडे


वेब टीम : परळी
गोपीनाथ गड या ठिकाणी १२ डिसेंबरच म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केले. या सगळ्या शक्तीप्रदर्शनावर धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे.

“पेल्यातले वादळ पेल्यातच शमणार” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेना टोला लगावला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

भाजपा हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे मी या पक्षापासून वेगळी होणार नाही. पक्षाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांनी खुशाल घ्यावा असे म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली.

पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी १ डिसेंबर रोजी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्या वेगळा निर्णय घेऊ शकतात अशीही चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही.

“माझ्या विरोधात असलेल्या नेत्याला रसद देण्यात आली असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

या त्यांच्या वक्तव्यावरुन आम्ही ताकदवान होतो हे तरी किमान त्या मान्य करतात. आमच्या हाती सत्ता नव्हती तरीही आम्ही सामर्थ्यशाली राहिलो”, यातच सगळे आले असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post