चिअर्स : नाताळ, थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत बार राहणार सुरु


वेब टीम : मुंबई
नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरं करणार्‍यासांठी चिअर्स…. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू राहणार आहेत. तर वाइन शॉप रात्री 1 वाजेपर्यंत खुले राहतील.

पार्टी करणार्‍यांनी स्वस्त मद्य घेताना सावध राहावं. आरोग्याला हानी करणारे अवैध आणि निकृष्ट दर्जाचे मद्य सेवन करू नये. पवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

दारूची दुकानं रात्री 11.30 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर रात्री 1.30 पर्यंत परमिट रूम सुरू ठेवता येणार आहेत. नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.

नाताळ आणि नव वर्ष साजरं करताना मद्य सेवन हे परमिट रूम किंवा घरी करावं. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करू नये. मुलांसमोर मद्य सेवन करू नका. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना 5 हजारांचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करताना आढळल्यास दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post