देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री- काळजीवाहू मुख्यमंत्री- माजी मुख्यमंत्री ते आता झाले विरोधीपक्षनेते


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी रविवारी भाजपने एकमताने गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

भाजपने पक्षाचे विधीमंडळ पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे पत्र दिल्याची माहिती पटोले यांनी काल सभागृहाला दिली.

फडणवीस यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या प्रस्तावावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post