विद्यार्थ्यांवरील गोळीबार म्हणजे जालियनवाला बागेसारखा प्रकार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


वेब टीम : नागपूर
जालियनवाला बाग असल्यासारखा विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जात आहे, देशातील युवा वर्ग अस्वस्थ आहे… हा ‘युवा बॉम्ब आहे.

त्याची वात काढण्याचे काम केंद्र सरकारने करू नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत दिल्लीतील जामिया विद्यापीठापासून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांवर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मी अत्यंत जबाबदारीने हे वक्तव्य करत असल्याचे सांगताना देशात अशांतीपूर्ण वातावरण तयार करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, जामियाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली.

जालियनवाला बागेचे दिवस परत आले की काय? अशी परिस्थिती दिसत आहे. ज्या देशाची युवा पीढी अशांत असेल तो देश स्थिर कसा राहू शकतो? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, ज्या देशांमध्ये युवक जिथे बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही म्हणून मी केंद्र सरकारला सांगतो की तुम्ही युवकांना बिथरवू नका, युवक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, शक्ति आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदाच्या मुद्द्यावर आज विरोधकांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. मात्र या बैठकीत शिवसेना सहभागी झाली नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post