पुणे : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने परदेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार


वेब टीम : पुणे
हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या परदेशी तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोघांनी दुचाकीवरुन निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला.

हा प्रकार विमाननगर परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पिडीत तरुणी ही तिच्या बहिणीसोबत कोंढवा परिसरात राहात असून तिचा साड्या आयात निर्यातीचा व्यवसाय आहे. ती सोमवारी सायंकाळी विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती.

त्यानंतर रात्री उशिरा ती कोंढव्याला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत असताना एक आरोपी हा मोपेडवरुन तेथे आला आणि लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला मागे बसवले.काही अंतर गेल्यावर त्याने मित्राला फोन करुन बोलावले.

तेव्हा पिडीत युवती आणि दोघे आरोपी दुचाकीवरुन जाऊ लागले. पिडीतेने मोबाइलवर माहिती तपासली असता आरोपी हे मोपेड कोंढवा येथे न नेता भलतीकडेच नेत असल्याचे लक्षात आले.

तेव्हा तिने त्यांना मोपेड थांबवण्याची विनंती केली. आरोपींनी मोपेड न थांबवता निर्जन स्थळी नेली. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केले.

पिडीतेने आरोपींना तिला मुख्य रस्त्यावर सोडण्याची विनंती केली. तिला घेऊन आरोपी मुख्य रस्त्याला येत असताना त्यांची दुचाकी घसरली. त्यावेळी आरोपी आणि पिडीत युवती खाली पडले.

तेव्हा तिथे असणाऱ्या काही युवकांना पाहून आरोपी पिडीतेला तेथेच सोडून पळाले. यानंतर तिने बहिणीला फोन करुन बोलावले आणि तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास विमाननगर पोलीस आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post