मी राहूल सावरकर नाही, राहुल गांधी; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार


वेब टीम : दिल्ली
राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या “रेप इन इंडिया” या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या वक्तव्यावर राहुल म्हणाले, माझे नाव राहुल गांधी आहे. राहुल सावरकर नाही.

मी किंवा कुठलाही काँग्रेसजन खरे बोलण्यासाठी माफी मागणार नाही. उलट पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनीच देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणल्याने त्यांनीच माफी मागावी.

राहुल गांधी यांचे वक्तव्य हिंदुत्ववादाच्या उजव्या विचारसरणीचे स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांच्यावर तिरकस टीका करणारे होते.

अंदमान निकोबार येथी सेल्युलर जेलमध्ये ब्रिटीशकाळात सावरकर यांनी दयेची याचिका केली होती. त्यासंदर्भात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विटरवरून काँगेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इटालियन मूळाबाबत ट्विट केले आहे. वीर सावरकर हे खरे देशभक्त होते.

कुणी आपले नाव गांधी लावल्यामुळे ते देशभक्त होऊ शकत नाही. खरे देशभक्त होण्यासाठी भारतीय रक्ताची गरज असते. अनेक लोकांनी या देशाला लुटले आहे, जे आम्हाला स्विकार्य नसल्याचे सिंह म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post