जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात चारही आरोपींना फाशीची शिक्षा


वेब टीम : जयपूर
जयपूरमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली.

सैफुर रेहमान, सरवर आझमी, मोहम्मद सैफ आणि सलमान अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पाचवा आरोपी शाहबाज हुसेनची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

जयपूरमध्ये १३ मे २००८ रोजी घडवलेल्या बॉम्बस्फोटात ८० निष्पाप लोकांचा बळी गेला होता तर १७६ जण जखमी झाले होते.

या प्रकरणातील दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post