वेब टीम : अहमदनगर जीवनसाथी वेबसाईटवरून संपर्क करून ओळख वाढवुन 33 वर्षीय तरूणास लग्नाचे आमिष दाखवुन त्याच्याकडुन 1 लाख 65 हजार रूपये घेऊ...
वेब टीम : अहमदनगर
जीवनसाथी वेबसाईटवरून संपर्क करून ओळख वाढवुन 33 वर्षीय तरूणास लग्नाचे आमिष दाखवुन त्याच्याकडुन 1 लाख 65 हजार रूपये घेऊन फसवणुक केल्याची घटना 16 नोव्हेंबर 18 ते 13 डिसेंबर 2019 या दरम्यान घडली.
हनुमान मोहनराव काळे (वय 33, रा. सारोळा, ता. जामखेड) याने लग्नासाठी त्याचे नाव जीवनसाथी या वेबसाईटवर नोंदवले होते. त्यातुन रेखा निलेश कदम (वय 19, रा. आकृती बिल्डींग, मार्केट जवळ, 19, वाशी, नवी मुंबई) नावाची अज्ञात व्यक्तीशी ओळख झाली.
व्हॉटसअप वरून त्यांनी एकमेकांशी संपर्क साधला व ओळख वाढविली. त्यानंतर काळे यास लग्नाच आमिष दाखवुन त्याच्याकडुन 1 लाख 65 हजार रूपये वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी घेवुन त्याची फसवणुक केली.
याप्रकरणी हनुमान काळे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 ड प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास पोलिस निरीक्षक अरूण परदेशी हे करीत आहेत.