माजी राष्ट्रपतीला न्यायालयाने सुनावली भयावह शिक्षा


वेब टीम : इस्लामाबाद
दोन दिवसांपूर्वी देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा होण्याआधी मुशर्रफ यांचा मृत्यू झाला तर इस्लामाबादच्या डी-चौकात त्यांचा मृतदेह तीन दिवस लटकवून ठेवण्यात यावा, असे निर्देश १६७ पानी निकालपत्रात देण्यात आले आहेत.

“सुरक्षा यंत्रणांनी फरार असलेल्या दोषी गुन्हेगाराला पकडून आणण्यासाठी त्यांच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करावेत व कायद्यानुसार शिक्षेची अंमलबजावणी करावी.

शिक्षा होण्याआधी मृत्यू झाला तर मुशर्रफ यांचा मृतदेह इस्लामाबादच्या डी-चौकात आणून तीन दिवस फासावर लटकवून ठेवावा. ” असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाने या खटल्यात मुशर्रफ यांना मंगळवारी ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने २ विरुद्ध १ मताने हा निकाल दिला. मुशर्रफ यांनी गुन्हा केला यावर न्यायाधीश सेठ आणि करीम यांचे एकमत होते तर न्यायाधीश अकबर यांचे मत विरोधात होते.

मुशर्रफ यांचा मृतेदह खेचून आणावा व तीन दिवस लटकवून ठेवावा, असे निकालपत्राच्या परिच्छेद ६६ मध्ये नमूद केले आहे. न्यायाधीश करीम परिच्छेद ६६ बरोबर सहमत नाहीत. परवेझ मुशर्रफ यांच्यावर सध्या दुबईमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपल्याविरोधातील सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post