... तरीही भाजपच्या हातून सत्ता जात असल्याने त्यांना आत्मचिंतनाची गरज : राऊत


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्रानंतर झारखंडही भाजपच्या हातून निसटत आहे. मोठी ताकद लावूनही भाजपच्या हातून सत्ता गेली आहे. त्यामुळे भाजपला आता आत्मचिंतनाची गरज आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. झारखंड निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

झारखंडची सत्ता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी ताकद लावली होती. दोघांनीही झारखंडमध्ये ठाण मांडले होते. प्रचारातून मतदारांना भुलथापा देण्याचा प्रयत्नही झाला.

पण देशातील जनता जागृत झालेली दिसते. झारखंडच्या जनतेने भाजपला नाकारलं. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर झारखंडच्या जनतेने विश्वास दाखवल्याने झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रा पाठोपाठ झारखंड गमावलेल्या भाजपने आता विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आत्मचिंतनाची गरज आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post