शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ४१ हजारांच्या पार


वेब टीम : मुंबई
गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स आणि निफ्टीने सुस्साट दौड घेतली आहे. आज 423 अंकांची झेप घेत सेन्सेक्सने तीन आठवड्यानंतर पुन्हा एकदा 41 हजार अंकांची पातळी ओलांडली.

सध्या तो 41 हजार 5 अंकांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 108 अंकांच्या वाढीसह 12 हजार 80अंकांवर व्यवहार करत आहे.

यापूर्वी सेन्सेक्स 27 नोव्हेंबर रोजी 41 हजार अंकांवर बंद झाला होता. मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षावर तोडगा निघण्याच्या शक्यतेने अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post