भाजपला उतरती कळा लागली आहे : शरद पवार

file photo

वेब टीम : मुंबई
भाजपला उतरती कळा लागली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर योग्य वेळी नागरिक केंद्र सरकारला झारखंडसारखे उत्तर देतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी झारखंडमधील निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सिल्व्हर ओक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे समाजात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान जे सांगतात आणि वस्तुस्थिती जी असते त्यात तफावत असते.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले अशी टीका पवार यांनी केली. केंद्रातील सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपला स्वीकारले नाही. त्याबद्दल आपण झारखंडच्या जनतेला धन्यवाद देतो.

झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राज्यस्तान या पाच राज्यांतून भाजप हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे.

केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता येथील जनतेने भाजपला नाकारले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच तुमचा राग शांत पद्धतीने दाखवा, जाळपोळ करू नका, अशा शब्दांत नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍यांना पवार यांनी आवाहन केले.

पवार पुढे म्हणाले, सत्तेवर आलेल्या घटकांनी शांतपणे पावले उचलायची असतात. आत्ताचे सत्ताधारी परिस्थिती चिघळेल अशी भूमिका घेताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून रस्ता मिळाला.

त्यातूनच झारखंडमध्ये भाजपच्या विरोधात सगळे एकत्र आले. झारखंड विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला धडा शिकवला. इतर राज्यांमध्येही संधी मिळाल्यानंतर जनताच भाजपला धडा शिकवतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post