'या' लोकांचे व्हॉट्सऍप होणार बंद


वेब टीम : लंडन
फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्स ऍपने खोटे मेसेज किंवा अफवा पसरवणारे मेसेज पाठवणाऱ्यांबरोबरच आता प्रमोशनल मेसेज पाठवणाऱ्यां विरोधातही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘बल्क मेसेज’ पाठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु केल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले. १५ सेकंदात १०० किंवा त्याहून अधिक मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार आहे.

हा निर्णय सध्या केवळ ‘WhatsApp Business’ वापरकर्त्यांसाठीच आहे. ७ डिसेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.

जे व्हॉट्सऍप बिजनेस युजर्स नवीन खाते उघडून पाच मिनिटांच्या आत बल्क मेसेज करतात त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.नवीन खाते तयार केल्यानंतर ५ मिनिटांत मोठ्या प्रमाणात संदेश पाठविणे किंवा प्रविष्ट करणे यावर कारवाई केली जाईल.

 कंपनी ते अकाउंट्स बंदही करु शकते. तसंच, काही मिनीटात डझनभर ग्रुप तयार करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर लक्ष ठेवणार आहे.

गेल्या वर्षापासूनच व्हॉट्सऍप नवनव्या फीचर्सद्वारे फेक न्यूज आणि अफवा पसरवणाऱ्या मेसेजेसवर लगाम लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.

खोट्या मेसेजमुळे गेल्या वर्षी मॉब लिंचिंगच्या काही घटना समोर आल्यानंतर सरकारने व्हॉट्सऍपला इशारा देताना नवीन पॉलिसी करण्यास सांगितले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post