अहमदनगर येथील दोघांना गावठी कट्ट्यासह येवल्यात पकडले


वेब टीम : अहमदनगर
धुळेकडुन नगरकडे घातक शस्त्रे घेऊन येणार्‍या नगरमधील दोघांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येवला शहरातील विंचुर चौफुली परिसरात सापळा रचुन शिताफीने अटक पकडले.

दिनेश ज्ञानदेव आळकुटे (वय 30, रा. पाईपलाईन रोड, सावेडी) व सागर मुरलीधर जाधव (वय 21, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) अशी अटक केलेल्या सराईतांची नाव आहे. पोलिसांनी त्यांच्याकडुन तीन गावठी कट्टे, मोबाईल फोन, हुंडाई कार (क्र. एम एच 16 बी एच 8380) असा दहा लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

नगरमधील काही गुन्हेगार घातक शस्त्र घेऊन धुळ्याकडुन नगरकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी विंचुर चौफुली परिसरात सापळा रचुन संशयित कार अडविली.

आतील दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यावरून पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता पोलिसांना 3 गावठी कट्ट्यासह काडतुस मिळुन आली.

येवला पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यातील दिनेश आळकुटे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असुन त्याची कसुन चौकशी पोलिस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post