अहमदनगर : रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत नगरचा खेळाडू चमकला


वेब टीम : अहमदनगर
नागोठाणे (जि. रायगड) येथे सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी क्रिक्रेट सामन्यामध्ये झारखंड विरूद्ध महाराष्ट्र संघातर्फे खेळत असलेल्या नगरच्या अझीम काझी (तांबटकर) याने चमकदार कामगिरी करत 140 धावा सातव्या विकेटसाठी विशांत मोरेबरोबर 240 धावांची विक्रमी भागीदारी केली. यामध्ये अष्टपैलू अझीम काझी याचे 15 चौकार तर 2 उत्तुंग षटकाराचा समावेश होता.

महाराष्ट्र संघाच्या सुरुवातीला 5 बाद 80 धावा होत्या मात्र अझीम काझी हा खेळावयास आल्यावर त्याने विशांत मोरेबरोबर भागीदारी केली धावासंख्या झपाट्याने वाढविली. अझीम काझी हा उत्कृष्ट फलंदाजाबरोबरच गोलदाजही आहे.

याआधीही हुडेकरी स्पोर्ट अॅकॅडमीचा खेळाडू अझीम काझी याने विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुस्ताक अली स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व केले. आणि भरीव कामगिरीने आपली निवड सार्ध केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post