हिजबूलच्या टॉप कमांडरचा जवानांनी केला खात्मा


वेब टीम : दोडा 
भारतीय जवानांनी जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे आज हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या जिल्हा कमांडर हारुण हफाजचा खात्मा केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी चंद्रकांत शर्मा व त्यांच्या सुरक्षा रक्षाकसह किश्तवाड येथील परिहार बंधुंचा हारुण हफाज हा गुन्हेगार आहे.

हारुण हफाजचा बरेच दिवसांपासून शोध सुरू होता. पोलिसांनी त्याच्यावर तब्बल १५ लाख रुपायांचा इनाम देखील ठेवलेला होता. या कारवाईनंतर परिसरात अन्य देखील दहशतवादी लपून बसलेले असल्याची शक्यता असल्याने, जवानांकडून संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबलवी जात आहे.

प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तीन संशयित दहशतवाद्यांना देखील ताब्यात घेतले. ख्वाजा मोइद्दीन, अब्दुल समद आणि सय्यद अली नवाज अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले.

दिल्ली-एनआरसी किंवा उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा ते कट रचत असल्याची माहिती समोर आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post