शरीरामधील चरबी वाढली आहे; 'हे' उपाय करा आणि घटवा चरबीचे प्रमाण


वेब टीम : पुणे
शरीरातील चरबी घटविण्यासाठी आल्याचे पाणी अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. या पाण्याच्या सेवनाने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होत असून यामध्ये वापरले जाणारे साहित्य संपूर्णपणे नैसर्गिक असून याचे बहुधा कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत.

विशेषतः दंड, पोट, मांड्या इत्यादी ठिकाणी साठून राहिलेली चरबी कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला गेला आहे. त्याचबरोबर ज्यांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे, त्यांच्यासाठी हे पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवणारे आहे.

या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून, यामुळे शरीरातील फ्री रॅडीकल्स अवयवांना किंवा टिश्यूंना अपाय करू शकत नाहीत.

या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरोलचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती या पाण्याच्या सेवनामुळे उत्तम राहत असून, शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे ‘इन्फ्लेमेशन’ असल्यास ते दूर होते.

या पाण्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असून यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. एखाद्याला खूप ताप येत असेल तर या पाण्याच्या सेवनाने ताप उतरण्यास मदत होते.

या पाण्याच्या नियमित सेवनाने खाल्लेल्या अन्नातील पोषक द्रव्ये शरीरामध्ये अवशोषित होण्यास मदत होते. जर एखाद्याची भूक कमी झाली असेल, तर या पाण्याच्या नियमित सेवनाने भूक पूर्ववत होते आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. ज्यांना सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी ही या पाण्याचे सेवन नियमित करावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post