मला नाईटलाइफ हा शब्दच आवडत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी या संदर्भात घोषणा केली होती.

मुंबईत २६ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या नाईट लाईफच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.

“प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असल्याने ‘नाईटलाइफ’चा प्रस्ताव राज्यभर राबविणे योग्य ठरणार नाही. मुंबईत ठराविक ठिकाणी हे प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो.

मूळात मला नाईटलाइफ हा शब्दच आवडत नाही,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.

या संदर्भात एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले. सुरुवातीच्या काळात निवडक भागात मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल २४ तास खुले ठेवण्याची परवानगी देणार आहे.

त्यानंतर या सर्वांचे मूल्यांकन करता येईल. त्यातून लोकांच्या तक्रारीही दूर करण्यात येतील.

आदित्य ठाकरे यांनी १६ जानेवारी रोजी महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रमुख, मॉल आणि हॉटेल असोसिएशनच्या प्रमुखांची भेट घेतली होती.

काळा घोडा, वांद्रे कुर्ला संकुल आणि नरिमन पॉईंट सारख्या अनिवासी भागात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी याची सुरूवात होणार आहे.

नाईट लाईफ संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरक्षेचे कारण पुढे केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी या निर्णयाला अनुकूल असल्याचे म्हटले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post