पेट्रोल-डिझेलचे दर उतरले; सलग सहाव्या दिवशी कपात


वेब टीम : मुंबई
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात केली. मुंबईत मंगळवारी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल २२ पैशांनी स्वस्त झाले.

मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८० रुपये ४२ पैसे झाला. तर डिझेल प्रति लीटर ७१ रुपये ३५ पैसे झाले. दिल्लीतसुद्धा पेट्रोल आणि डिझेल दरात कपात झाली. दिल्लीत पेट्रोलचा दर ७४.८२ रुपये आणि डिझेल ६८.०५ रुपये आहे.

कोलकात्यात पेट्रोल ८०.४२ रुपये आणि डिझेल ७०.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल दर ७७.७२ रुपये झाले आहे. डिझेलचा दर ७१.९० रुपये झाला.

इंधन कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती स्थिर आहेत.

त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर कमी करून ग्राहकांना दिलासा दिला. मागील सहा दिवसात पट्रोल प्रति लीटर ८८ पैसे आणि डिझेल १ रुपयाने स्वस्त झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post