संजय राऊत यांनी केली टीका; उदयनराजे समर्थकांनी पाळला साताऱ्यात कडकडीत बंद

file photo

वेब टीम : सातारा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध व्यक्त करत साताऱ्यात आज उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून कडकडीत बंद पाळला.

साताऱ्यात बाजारपेठ आणि ठिकठिकाणची दुकाने बंद ठेवल्याने सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प होते.उदयनराजेंच्या समर्थकांनी राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चा काढला.

यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तर उदयनराजेंसाठी काढलेल्या रॅलीत दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पाट्या टांगून निषेध व्यक्त केला.

सातारच्या बाजारपेठेतल्या नेहमीच्या गजबलेल्या ठिकाणी आज शांतता पाहायला मिळाली.उदयनराजे यांच्या समर्थकांनी उर्त्फुतपणे बंदला पाठिंबा दिला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती.

राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राऊत यांच्या वक्तव्यामुळे साताऱ्यासह सोलापूर, नगर आणि सांगलीतील वातावरण ढवळून निघाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post