दिल्ली निवडणूक : भाजपचा सुपडा साफ; पुन्हा एकदा 'आम आदमी' सरकार


वेब टीम : दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुपार पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार दिल्ली विधानसभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीकरांनी भाजपा व काँग्रेसला नाकारत पुन्हा एकदा आपला नेता म्हणून आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांचीच निवड केलीय. त्यामुळे, मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना तिसरी संधी मिळणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा होता शाहीन बागचा… परंतु, याचा खरंच भाजपला फायदा झाला का की ही गोष्ट आपच्या पथ्यावरच पडली? असा सवाल निकालानंतर विचारण्यात येतोय.

यंदाच्या निवडणुकीतही मुस्लीम मतं आपच्याच पारड्यात पडलेली दिसत आहेत. परंतु, 2015 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा आपच्या जागा निश्चितच घटलेल्या दिसत आहेत.

सीएएच्या विरोध प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शाहीन बागच्या ओखला मतदार संघाबद्दल बोलायचं तर इथं आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्लाह खान यांनी विजय मिळवलाय.

त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केलंय. अमानतुल्लाह यांनी ब्रह्मसिंह यांच्यापेक्षा तब्बल 28501 मतांच्या फरकानं विजय मिळवलाय.

2015 साली 70 पैंकी तब्बल 67 जागांवर विजय मिळविणाऱ्या आम आदमी पार्टीने ६२ जागा जिंकल्या आहेत. तर 2015 साली केवळ 3 जागांवर विजय मिळालेल्या भाजपला ८ जागांवर समाधान मागावे लागणार आहे.

काँग्रेस गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही भोपळा फोडता आलेला नाही. काँग्रेसच्या एकूण मतांच्या गणितातही घसरण झालेली दिसून येतेय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post